अध्यक्ष संदेश
प्रभात श्रीराम पाध्ये
अध्यक्ष
नगर वाचनालय, राजापूरच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक स्वागत! सन १८६७ पासून ज्ञान, वाचनसंस्कृती आणि सामाजिक प्रबोधनाची परंपरा जपणारे नगर वाचनालय, राजापूर हे तालुक्यातील एक प्रतिष्ठित आणि शासनमान्य "अ" वर्गाचे ग्रंथालय आहे. गेली १६० वर्षे वाचनप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि नागरिकांसाठी हे वाचनालय ज्ञानाचे समृद्ध केंद्र म्हणून कार्यरत आहे. वाचनालयामध्ये वाचन विभाग, महिला विभाग, बाल विभाग, संदर्भ विभाग, अभ्यासिका तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध आहे. आधुनिक काळाची गरज ओळखून ग्रंथालयीन सेवांचे संगणकीकरण, इंटरनेट सुविधा, डिजिटल सेवा, WI-FI सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाचकांना अधिक उत्तम सेवा देण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे. आज वाचनालयात हजारो ग्रंथसंपदा, नियतकालिके, दैनिके आणि दुर्मिळ पुस्तके उपलब्ध असून, ज्ञानाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून वाचनालयातील विविध उपक्रम, कार्यक्रम, सुविधा आणि सभासद नोंदणीची माहिती आपल्यापर्यंत अधिक सुलभपणे पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रवास
नगर वाचनालय, राजापूर स्थापना