आमच्या सेवा
नगर वाचनालय राजापूर हे पुस्तकप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि सर्व वयोगटातील वाचकांसाठी ज्ञानाचे प्रेरणादायी केंद्र आहे. पुस्तक देवघेव विभाग, वर्तमानपत्र विभाग, बालवाचन विभाग आणि विविध साहित्यिक उपक्रमांद्वारे वाचन संस्कृती जपण्याचे कार्य सातत्याने केले जाते.५५ हजारांहून अधिक ग्रंथसंपदा, शांत अभ्यासाचे वातावरण आणि ज्ञानसमृद्ध उपक्रमांच्या माध्यमातून वाचनाची आवड वाढवून समाजात बौद्धिक आणि सांस्कृतिक जाणीव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सुविधा
सन 1900 पूर्वीची दुर्मिळ ग्रंथसंपदा उपलब्ध आहे.
अतिथींसाठी सुसज्ज विश्रामगृह उपलब्ध आहे.
गरम व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा.
सभासदांसाठी इंटरनेट व Wi-Fi सुविधा उपलब्ध.